Political News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News: 'भारत हा हिंदुराष्ट्र...', पोस्ट केली कोणी? हिंदुराष्ट्रच्या ट्विटवरून भाजपमध्ये मतभेद

हिंदुराष्ट्राचा अजेंडा, भाजपचा नाही सुधीर मुनगंटीवर यांची प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल... अशी पोस्ट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आली होती. या ट्विटमुळे, भाजपमध्येच मतभेद दिसून येत आहेत. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी, भाजपचा असा कोणताही अजेंडा नसताना, असं ट्विट कुणी आणि का केलं? हे समोर येईलच, असं वक्तव्य केलं आहे.

मुनगंटीवर यांच्या या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की मुद्दाम केली गेली? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पोस्टमुळे विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

हिंदुराष्ट्र ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी हिंदुराष्ट्र हीच आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हिंदुराष्ट्र म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश, असा त्याचा अर्थ सांगितला आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवर यांनी तर हिंदुराष्ट्राचा अजेंडा, भाजपचा नाही, असं म्हणत, या ट्विटच्या चौकशीचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया

विरोधकांनी भाजपवर या पोस्टनंतर टीका केली होती. भाजपाच्या या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, देशाच्या संविधानाला जे लोक मानत नाहीत. त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा केली भारताचं संविधान आहे. संविधान आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे. संविधान नसतं तर ते उपमुख्यमंत्री झाले नसते असं नाना पटोले काल म्हणाले होते.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, भारत हे हिंदुराष्ट्र असेल आणि ते हिंदुराष्ट्रच मानायचे असेल तर या राज्यातील सर्व धर्माचे लोकं वाऱ्यावर सोडून द्यायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असंच असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी न ठेवता ते बदलून ते हिंदुस्तान जनता पार्टी करावे असा खोचक टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT