bjp 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने भाजपच्या आशा पल्लवित, कारण... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही, त्यामुळे सीएएला कुणी घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने भाजपचे नेते खूष झाले आहेत. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसने शिवसेनेला फसविल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असतानाच प्रदेश प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी सीएएच्या समर्थनासाठी ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. भाजपचे माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तर "तू यार है किसी और का, तुझे चाहता है कोई और है', असे सांगत शिवसेनेचे आम्ही अद्यापही चाहते असल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेसने नियोजनपूर्वक षड्‌यंत्र रचून शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निर्माण होत असलेली पोकळी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरून काढेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच सकारात्मक भूमिका मांडली आहे. या कायद्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले आहेत. हीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सातत्याने मांडत आहेत, असे पाटील म्हणाले. 

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबद्दल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुलाखतीत म्हटले असून, त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. भांडारी म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची वक्तव्ये सीएएविषयी वस्तुस्थिती स्पष्ट करणारी आहेत. ते म्हणतात, की सीएएबद्दल किती गैरसमज आहेत ते आधी दूर करायला हवेत. सीएए हा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाही. हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. त्यांच्या पक्षाने लोकसभेत सीएएच्या बाजूने मतदान केले होते. आजच्या वक्तव्यानंतर त्यांनी सीएएच्या समर्थनाची स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे भांडारी म्हणाले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदी सिनेमातील गाण्याच्या आधारे शिवसेना आमचा मित्रच असल्याचे खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

सीएएला काँग्रेसचा विरोध आहे. सीएए कायद्याबाबत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका सांगितली आहे, सरकार म्हणून निर्णय घेताना तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय घेण्यात येईल. 
- डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री 

तू यार है किसी और का, तुझे चाहता है कोई और है. 
- सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT