Unmesh Patil With Shivsena UBT Esakal
महाराष्ट्र बातम्या

Unmesh Patil With Shivsena UBT: उन्मेश पाटील, करण पवारांच्या पक्षांतराबद्दल भाजप नेते अनभिज्ञ! महाजन म्हणतात, ‘ते आपल्या संपर्कात नाहीत’

Unmesh Patil With Shivsena UBT: भारतीय जनता पक्षाची जळगाव लोकसभेची उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार बुधवारी (ता. ३) मुंबईत दुपारी बारा वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार पक्ष सोडून ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र, याबाबत जिल्ह्याचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की याबाबत आपल्याला केवळ सोशल मीडियावर व माध्यमांकडून माहिती मिळाली आहे, प्रत्यक्षात दोघांशी आपला संपर्क झालेला नाही.

भारतीय जनता पक्षाची जळगाव लोकसभेची उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार बुधवारी (ता. ३) मुंबईत दुपारी बारा वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने जळगाव लोकसभेत काही अंशी खदखद निर्माण झाली, त्यानंतर दोघांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई येथे दोघांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या समवेत जळगाव येथील शिवसेनेचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सुरू असलेल्या या घडामोडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही जोरदार खळबळ उडाली असून भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव व रावेर लोकसभेत भाजप उमेदवारांवर त्यांचा परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

याबाबात भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यांशी संपर्क साधला असता गिरीश महाजन म्हणाले, की जिल्ह्यातील मुंबईत सुरू असलेल्या घडामोडीची माहिती आपल्या प्रसिध्दी माध्यम व सोशल मिडियावरून मिळाली आहे. परंतु खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांनी आपल्याशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क साधलेला नाही.गेल्या चार पाच दिवसापासून आपण मुंबईतच आहोत परंतु त्यांनी आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याबाबत कोणतीही चर्चा नाही व याची माहितीही नाही. त्यांनी संपर्क केल्यास आपण त्यांच्याशी निश्‍चित चर्चा करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT