BJP Mega Plan for Lok Sabha Elections 225 leaders will hold meeting vote bank pm modi amit shah politics
BJP Mega Plan for Lok Sabha Elections 225 leaders will hold meeting vote bank pm modi amit shah politics esakal
महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’ ; पक्षाचे २२५ नेते घेणार सभा ; ८० कोटी लोकांपर्यंत पोचणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असतानाच ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मेगा प्लॅन’ आखला असून, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे तब्बल २२५ नेते देशभरात सभांचा धुरळा उडविणार आहेत.

सर्व मतदारसंघातील सुमारे ८० कोटी लोकांपर्यंत पोचून मोदी सरकारच्या कामाचा गजर करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. मोदी यांच्या करिष्यावर भाजप निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने स्पष्ट आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या काळातील काम लोकांपुढे मांडण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत.

त्यातून पुढील निवडणुकांच्या प्रचारालाही सुरवात केली जात आहे. सरकारच्या कामांना लोकांपुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या अभियानाची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली. तावडे म्हणाले, ‘‘या अभियानातून लोकांना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मोदी यांच्या १२ सभा होतील. त्याशिवाय पक्षातील २२७ वरिष्ठ नेते सभा घेऊन सरकारची कामगिरी मांडणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात हे अभियान होईल’’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT