bjp Mla Ashish Shelar esakal
महाराष्ट्र बातम्या

BCCI ची मोठी जबाबदारी; आशिष शेलारांकडे तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी

सकाळ डिजिटल टीम

सध्या बीसीसीआयमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपला असून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. (bjp Mla Ashish Shelar becomes new BCCI treasurer )

खजिनदार म्हणून शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आता शेलार यांच्याकडे असणार आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत दिले आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले.

त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.

रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहे. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT