Krishna Khopade on Amol Kolhe Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोल्हे नथुरामच्या भूमिकेचं मानधन परत करणार का? भाजप आमदाराचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नथुराम गोडसेची भूमिका केल्याने खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) वादात सापडले आहेत. त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण, भूमिका केली त्यावेळी मी राजकीय पक्षाशी संबंधित नव्हतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आळंदी येथे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या रक्षा विसर्जन स्तंभ परिसरात आत्मक्लेश केला. त्यावरूनच आता भाजप आमदारांनी (BJP MLA) टीका केली आहे.

नथुरामची भूमिका केली म्हणून आत्मक्लेश करणारे अमोल कोल्हे या भूमिकेसाठी मिळालेले मानधान परत करणार का? असा प्रश्न नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. तसेच पुछता है भारत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमका काय आहे वाद? -

''Why I Killed Gandhi'' हा चित्रपट आज रिलीज होत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. काँग्रेसने देखील विरोध केला. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः अमोल कोल्हेंना पाठिंबा दिला. कलाकार म्हणून ते भूमिका करू शकतात. याचा अर्थ त्यांची विचारसरणी तशी आहे असं नाही, असे शरद पवार म्हणाले होते. तसेच माझ्या भूमिकेकडे फक्त कलाकार म्हणून बघावं, असं अमोल कोल्हे म्हणाले होते.

अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश -

व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो, असे अमोल कोल्हे म्हणाले. त्यांनी आळंदी येथे महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभ परिसरात आत्मक्लेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT