BJP MLA atul bhatkhalkar tweet after literal argument with MLA abu azmi Monsoon assembly session 2023 rak94 esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : अबू आझमी अन् भाजपा आमदारांत जुंपली; वादानंतरचं ट्वीट चर्चेत

रोहित कणसे

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरू सत्त काहीना काही वाद होताना पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यात वंदे मातरम बद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता जम्मू आणि कश्मिर येथील हिंदूंबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद सरु होण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाते आमदार आझमी यांनी काश्मिर आणि काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यचावरून भाजपचे आमदार अतुल भातकळकर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. अबू आझमी यांनी सभागृहात बोलताना काश्मिरमध्ये फक्त ८९ पंडितांची हत्या झाल्याचं विधान केलं. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर आणि आझमी यांच्यात वाद पेटला.

भाजप आमदार अतुळ भातकळकर यांनी सभाग्रहातील या वादाचा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ पोस्टमध्ये त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. "मावा आघाडीचे (महाविकास आघाडीचे) सरकार असताना अबू आझमी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसला होता. पण बहुधा सरकार बदलले आहे, याचा त्याला विसर पडला असावा. कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडीतांची हत्या झाली असे निलाजरे विधान केल्यानंतर सभागृहात त्याला जाम हाणला..."

भातखळकर काय म्हणाले?

"अबू आझमी बोलले की फक्त ८९ हिंदू पंडितांची हत्या झाली. एक व्यक्ती जरी केली तर ती तेवढीच महत्वाची असते. त्यांचे उद्गार काढून टाका. फक्त ८९ म्हणजे काय? अध्यक्षांच्या माध्यमातून मी त्यांना (अबू आझमी) विचारतोय, या सदनात भाषण करण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणार की नाही? हे आधी सांगा आणि मगच बोला! आरएसएसचा उल्लेख का करता इकडे? या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT