BJP MLA Ganesh Naik e sakal
महाराष्ट्र बातम्या

गणेश नाईक यांना अटक होणार? महिला आयोगाच्या हालचाली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नाईक यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.

''एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अपत्य झालं. पण, भाजप आमदार गणेश नाईक यांनी अपत्याचा स्वीकार केला नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई केली जाईल'', अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी केली.

नेमके आरोप काय? -

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ''गणेश नाईक आणि आपण १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून १५ वर्षांचा मुलगा आहे. पण, आमदार गणेश नाईक यांनी माझ्या मुलाला स्वीकारण्यास नकार दिला. माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी गणेश नाईक यांनी दिली.'' याबाबत काही दिवसांपूर्वीच संबंधित महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी संबंधित महिलेने केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल करून तिला २४ तास संरक्षण दिले आहे. याप्रकरणी राज्याच्या महिला आयोगाकडेही संबंधित महिलेने तक्रार नोंदवली होती. महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बागेश्वर येथील मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त लोकांना भेट दिली

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT