Ganpat Gaikwad  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ganpat Gaikwad : गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांना अटक; म्हणाले, माझ्याकडे पर्याय नव्हता...

भाजप आणि शिंदे गटामध्ये झालेल्या राड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे.

संतोष कानडे

उल्हासनगरः भाजप आणि शिंदे गटामध्ये झालेल्या राड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन गोळ्या महेश यांना लागल्याचं सांगितलं जातंय.

घटनेत जखमी झालेले सेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी रात्री काय घडलं?

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जमले होते. भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांचे कार्यकर्ते तसेच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते.

आपापसातील वाद मिटवण्यासाठी हे पदाधिकारी जमले होते. या दरम्यान झालेल्या वादावादीतून ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याचं कबूल केलं आहे. ते म्हणाले की, मी गोळ्या झाडल्या असून मला पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत असेल तर मी काय करु? आपण पाच राऊंड फायर केल्याचं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात केवळ आरोपी तयार होतील. आज त्यांनी माझ्यासारख्या एका चांगल्या माणसाला आरोपी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

SCROLL FOR NEXT