महाराष्ट्र बातम्या

नेते टक्केवारीच्या फुगड्या खेळतायत का? पडळकरांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

रिक्त पदे जास्त असूनही ठाकरे सरकारने लोकसेवा आयोगाकडे पदभरतीसाठी कमी जागांची मागणी केली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच रिक्त पदे जास्त असूनही ठाकरे सरकारने लोकसेवा आयोगाकडे पदभरतीसाठी कमी जागांची मागणी केली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, वेगवेगळ्या वीस विभागातील ११ हजार ३५१ पद रिक्त आहे. मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त ४ हजार २६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी केली. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील पद २५०० च्या आसपास पद रिक्त आहेत. तरीही अमित देशमुख यांच्या खात्याने लोकसेवा आयोगाला काहीच मागणी केली नाही. हीच बोंब अनके खात्यांची आहे.

ठाकरे सरकार आणि प्रशासनात सावळा गोंधळ असल्याचा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केला. प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का? असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.

सरकारवर टीका करताना पडळकर म्हणाले की, स्वताची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात. मात्र बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bank Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT