Rashmi Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओसाठी रश्मी, उद्धव ठाकरेंकडून दबाव; भाजप नेत्याचे गंभीर आरोप

रोहित कणसे

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. सध्या नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं. यादरम्यान आता नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.

चंद्रकांत देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत.

नेमकं नितेश राणे काय म्हणाले...

नितीन देसाई हा एक चांगला माणून होता. ते फार मेहनती होते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. इतकेच नाही तर राणे यांनी एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीच्या निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखाल यावेळी केला.

संजय राऊत यांच नाव न घेता राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, यंत्रणेला जो दिवसरात्र धमक्या देतोय, २०२४ ला नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार आणि हा आतमध्ये जाणार. कारण याने जे लोकांचे पैसे खाल्लेत, तुझं काही वाचणं नाही. तु आणि तुझ्या मालकाचा मुलगा दोघं आर्थर रोज जेलमध्ये जाणार असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

सनी देओल यांच्यावरून राऊतांचा सवाल..

काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी भाजपचे नेते खासदार सनी देओल यांच्य जुहू येथील बंगल्याचा प्रस्तावित लिलाव थांबवण्यात आल्यानंतर भाजपवर टीका केली होती.

या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत ही जाहिरात बँक ऑफ बडोदाला मागे घ्यावी लागली. सनी देओल यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही मिळाला? असा सवाल संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला होता. दरम्यान राऊतांच्या या प्रश्नांनंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT