Nitesh Rane Hate Speech Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

याप्रकरणात माझगाव कोर्टानं त्यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात अजामिनपात्र वॉरंट बजावलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या एका खटल्यात अटक टाळण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणात माझगाव कोर्टानं त्यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात अजामिनपात्र वॉरंट बजावलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात गेल्यावर्षी अब्रूनुकसानीच्या खटला दाखल केला होता. याप्रकरणी माझगाव कोर्टानं नितेश राणेंविरोधात ऑगस्टमध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावलं होत. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी राणे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी येत्या १७ रोजी पुन्हा सुनावण होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

७ मे २०२३ रोजी नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टिप्पणी करताना राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगताना याद्वारे राणेंनी आपली बदनामी केली असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. यानंतर माझगाव कोर्टानं राणेंना समन्स बजावलं होतं. पण हे वॉरंट आपल्याला मिळालं नाही असं सांगत ते कोर्टात हजर राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT