jitendra awhad sakal media
महाराष्ट्र बातम्या

'आव्हाडांच्या पवारांना अनोख्या शुभेच्छा', MHADA परीक्षेवरून भाजपची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : म्हाडाच्या विविध पदांसाठी आज परीक्षा (MHADA Exam) होणार होती. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Minister Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री एक व्हिडिओ जारी करत परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले असून भाजपकडूनही राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

''आज लाखो विद्यार्थी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटर लांब असणाऱ्या परीक्षा ठिकाणी एसटी, रेल्वेने पोहोचले. हजारो विद्यार्थी एसटी स्टॅन्डवर, रेल्वे स्थानकावर झोपले. पण पहाटे परीक्षा रद्द करण्याची घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष माननीय पवार साहेबांना अनोख्या शुभेच्छा दिल्या वाटतं'', अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी केली. तसेच नालायक, निष्क्रिय आणि वाचाळ महाभकास आघाडी असून त्यांचा निषेध नोंदवत असल्याचेही ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण? -

आज म्हाडाच्या इंजिनिअरींग पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होती. काही परीक्षा सकाळच्या सत्रात, काही परीक्षा दुपारच्या सत्रात होणार होत्या. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री २ वाजता ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत या परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली. त्यानंतर आम्ही शेकडो किलमीटरवरून परीक्षा केंद्रावर आलो असून आमचा खर्च कोण भरून देईल? असा सवाल करत विद्यार्थ्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला. त्यानंतर हा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT