Devendra Fadnavis and Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: शिंदे पिता-पुत्रांना ललकारले; ठाण्यासह 'या' महत्त्वाच्या जागेवर BJP आमदाराचा मोठा दावा

ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा मोठा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप यांच्यात वारंवार एका जागेवर दावा सांगितले जात असल्याचे समोर येत आहे. अशातच शिंदे गट आणि भाजपमध्ये लोकसभेच्या जागांवरून जुंपल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हंटलं होतं. त्यानंतरही भाजप-शिंदे गटातील कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. याप्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आणि वादावर पडदा पडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

यानंतरही, दोन्ही पक्षातील कुरबुरी संपलेल्या दिसत नाही. भाजपने आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर आता ठाणे आणि पालघरवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Latest Marathi News)

भाजपचा काल ठाण्यात मेळावा होता. या मेळाव्याला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन यांच्यासमोरच या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. 2014मध्ये मोदींमुळे निवडून आलेले लोक आता ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा करत आहेत. हे सर्वजण मोदी ट्रेनमध्ये बसूनच लोकसभेत निवडून गेले असं त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

'आपल्या पक्षातील असोत किंवा दुसऱ्या पक्षातील, सर्वजण मोदी लाटेत निवडून आले होते. आता अनेक प्रकारचे दावे करत आहेत. मला आश्चर्य वाटतं. किवही वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून जाऊ शकणार नाही. ठाणे, कल्याण, पालघर हा जिल्हा भाजपचाच होता. कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच आहे, असं संजय केळकर यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT