Suresh Dhas Latest Marathi News Sakal
महाराष्ट्र बातम्या

"इथं आम्ही गोट्या खेळायला आलो का?" सभागृहात लेट येण्यावरून भाजपचे सुरेश धस आक्रमक | Video Viral

Suresh Dhas Latest Marathi News: शेतकऱ्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला जात असताना कोण जबाबदार अधिकारी उपस्थि आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. आज सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या अधिकारी आणि मंत्र्यांना समज देण्याची मागणी त्यांनी तालिका सभापतींकडे केली.

दरम्यान, "आमच्याकडे गाडी नसली तर आम्ही टॅक्सी करून येतो. आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. आम्ही काय पागल आहोत काय इथं येऊन बसायला. इथं मंत्री नाहीत, अधिकारी नाहीत दहा मिनीटांनी लेट आले, त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे. हे सर्वोच्च सभागृह आहे.

इथं आम्ही काय गोट्या खेळायला येतो काय? कृषी विभागाचा जबाबदार अधिकारी कोण आहे सांगा बरं... इथं आत्महत्येसारखा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतला आहे, तरी इथं सरकारमधले जबाबदार मंत्री उपस्थित नाहीत.

आपण काल वेळ कशासाठी वाढवून घेतली? दरवेळेस काही ना काही कारण दिलं जातं." अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

त्यानंतर तालिका सभापती यांनी अधिकारी आणि मंत्र्यांना समज देऊ असं आश्वासन दिलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यानंतर सभागृहात उपस्थिती लावून सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT