महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा

आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा जवळचा असल्याची बतावणी केली

धनश्री ओतारी

राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा जवळचा असल्याची बतावणी केली आहे.(BJP MLAs cheated ministership one arrested maharashtra politics )

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, मंत्रीपदाचं आमिष दाखवून आमदारांकडून १ कोटी ६६ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. निरज सिंह राठोड असं या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नावं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

भाजपचे मध्य नागपूरमधील आमदार विकास कुंभारे यांना 7 मे रोजी फोन कॉल केला होता. त्यांना मंत्रीपदाचा आमिष दाखवत पैशाची मागणी केली. मात्र विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

पैशांच्या मोबदल्यात मंत्रिपद, आमदारांना गंडा घातल्याचे आता उघड झाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

जे पी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून बोलतोय. साहेब बोलणार असे सांगत थेट बदनापूरच्या भाजप आमदार नारायण कुचे याना पैशांच्या मोबदल्यात मंत्री पदाची ऑफर देण्यात आली. नारायण कुचे यांनी दिल्ली ऑफिसमधून बोलत असल्यामुळे आणि नड्डा यांच्या जवळचा म्हणून जवळपास दोन लाख रुपये दिले सुद्धा.

मात्र कुणीतरी फसवत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी फोन उचलणे बंद केले. याबाबत आता ते पोलिसात सुद्धा तक्रार करणार आहोत, असे एका आमदारांने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT