Girish Bapat Sakal
महाराष्ट्र बातम्या

...पण आता मी भाजपसह सर्वांवरच नाराज; खासदार बापटही स्पष्टच बोलले

दत्ता लवांडे

पुणे : "मी एवढे वर्षे राजकारण केलं पण कधी कुणावर व्यक्तीगत टीका केली नाही. मी जी कामे केली ती नि:स्वार्थपणे केली पण सध्याचे राजकारण पाहता मी वैयक्तिकरित्या माझ्या पक्षांसह सर्वांवर नाराज आहे." असं मत पुण्याचे खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. सकाळचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी त्यांनी बातचीत केली त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

(BJP MP Girish Bapat On Maharashtra Politics)

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सध्याच्या राजकारण आणि राजकारण्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकारण्यांनी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता कामं करायला हवीत. पण सध्याचे राजकारणी विनाकारण खर्च करतात, जेवण देतात, फ्लेक्स लावतात पण काम काहीच करत नाहीत. आम्ही एवढ्या वर्षात नि:स्वार्थपणे काम केले पण कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. त्यामुळे मी माझ्या पक्षांसह सर्वांवरच नाराज आहे. पण हे माझं व्यक्तिगत मत आहे अशी खंत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मागच्या दोन महिन्यात राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला बंड केलं आणि २०१९ मध्ये शिवसेनेनी युती तोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन असं म्हणत खरंच पुन्हा सत्तेत येऊन दाखवलं. या काळात अनेक राजकीय घटना घडल्या. विरोधातून लढलेल्या सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची युती झाली. महाविकास आघाडीत अडीच वर्षातच खटके उडाले आणि शिंदेंनी सेनेसोबत बंड केले. त्याचबरोबर नव सरकार सत्तेत आलं. पण या सगळ्या राजकारणार जेष्ठ नेते आणि भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजकारण्यांनी कोणताही स्वार्थ मनात न ठेवता काम केलं पाहिजे पण सध्याचे राजकारणी काम करत नाहीत, फक्त फ्लेक्स लावतात, जेवण देतात. त्यामुळे मी व्यक्तिगतपणे नाराज आहे. अशी नाराजी बापटांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सध्याच्या राजकारणावरील नाराजीवर भाजपकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT