Uddhav Thackery Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackery: "उद्धव ठाकरेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे"

उद्धव ठाकरे यांच्या मुखातून निघालेले शब्द पचत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीका भाजप खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. महिला मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्यावरून नवनीत राणा यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुखातून निघालेले शब्द पचत नाहीत असंही नवनीत राणा यांनी म्हंटलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा बोलताना म्हणाल्या की, महिला मुख्यमंत्री नक्कीच व्हायला पाहिजे परंतु ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं आहे ते त्यांच्या तोंडातून शोभत नाही. ते बोलले ते पचत नाही. ज्यांना स्वत: मुख्यमंत्री होण्याची हौस आहे ते कसं काय हे स्वप्न पाहू शकतात. आम्ही त्यांच्या या व्यक्तव्याला गांभीर्याने घेत नाही. पण जर राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्या तर गर्वच होईल असंही राणा म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कार्यक्रमावेळी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.



काल मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊ. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या ते अनुभवतोय गद्दार आता मूठभरही राहिले नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आपल्याला राज्यात पुन्हा सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. मग ती महिला असो किंवा पुरुष असंही ते बोलताना म्हणालेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT