BJP MP Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

'जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतंच'; मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा सरकारला सूचक इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवा. सहज प्रश्न सुटतील.'

सातारा : जास्त दिवस घोंगडे भिजत ठेवले तर ते वास मारते. जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केले, तर चीड येणारच. इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवली, तर सहज प्रश्न सुटतील, असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. सरकार (Maharashtra Government) अजूनही मराठा आरक्षणावर तोडगा काढू शकले नाही. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले.

उदयनराजे म्हणाले, ‘‘इतर राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. याची आठवण करून देत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवा. सहज प्रश्न सुटतील. ७० ते ७२ टक्के आरक्षण होऊ द्या. हाच पर्याय आहे; पण जास्त दिवस घोंगडे भिजत ठेवले तर ते वास मारते. जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केले तर चीड येणारच.

ज्यावेळी मंडल आयोग (Mandal Commission) जाहीर केला त्या वेळेस सगळे केले असते तर हा विषय राहिलाच नसता. शिक्षण क्षेत्रामध्ये फीमधील तफावतीमुळे समाजातील मुले त्रासली आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी यावर विचार करून तोडगा काढणे आवश्यक आहे. राज्यपातळीवर कुठल्याही समाजाला न दुखावता हा प्रश्न सुटू शकतो.’’

राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात बुधवारी निकाल दिला. या निकालानंतर ठाकरे गटाकडून ते सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले. याच निकालासंदर्भात ही परिस्थिती का निर्माण झाली? याचा विचार करायला हवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना उदयनराजे यांनी टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT