Udayanraje Bhosale: मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे राज्यभर आंदोलने झाली. कोश्यारी यांचे पुतळे जाळण्यात आले होते. मात्र भाजपकडून राज्यपालांची पाठराखन केली आहे. दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलं आहे.
हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अपमान वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करा, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केलीय. उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची देखील पत्राद्वारे तक्रार पंतप्रधान मोदींकडे केली आहे. या पत्रावर मोदी कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खासदार उदयनराजे यांनी पत्रात लिहिलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे,
हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे."
हेही वाचा: Eknath Shinde: शिंदे गटाचा कामाख्या देवीचा नवस फिटणार
काय म्हणाले होते भगतसिंग कोश्यारी
औरंगाबाद येथे बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले होते.
तर औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले होते ‘चाण्याक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात" असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.