महाराष्ट्र बातम्या

राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, मोदींकडे शिवसेनेची मागणी

नामदेव कुंभार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असं पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झालाय. भुताच्या हातात कोलीत दिल्यानंतर काय होतेय? याचा प्रत्यय भाजपला येत असेल, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. भाजपाने नारायण राणे यांना शिवसेनेवर भूंकण्यासाठी मंत्रिपदावर आणलं आहे, असा टीकेचा बाण राऊत यांनी सोडला.

राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत युवा सेनेच्या वतीने आंदोलन पुकारलं आहे. यासह राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. विनायक राऊत यांनी मोदी यांना पत्र लिहिलं असून राणे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं अशी विनंती केली आहे. त्यामुळे राज्यातील वाद आता केंद्रात पोहचणार आहे.

शिवसेनेनंही राणेंच्या विधानावरुन त्यांना सुनावलं आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, "स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडल आहे. इथे महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांबद्दल असं वक्तव्य करण्याऐवजी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या अंत्यसंस्कारावेळी तिरंग्यावर ज्या नतद्रष्ट्यानं भाजपचा झेंडा ठेवला होता त्यांचे आधी हात छाटावेत आणि नंतर महाराष्ट्रात येऊन अशी वायफळ बडबड करावी. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, माननीय उद्धवजी ठाकरे किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे. हे त्यांनी कदापी विसरता कामा नये."

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT