narayan rane sakal
महाराष्ट्र बातम्या

'मलाच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची शरद पवारांना विनंती'

सकाळ वृत्तसेवा

ते नेमके मुख्यमंत्री कसे झाले ते आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. मु

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांना हयात असताना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल', असा इशाराच राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. साहेबांना जे जमले ते तुम्हाला नाही जमायचं. जाहीर भाषणामध्ये क्षणोक्षणी साहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अन्यथा ते हयात असताना त्यांना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल असे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? यावर देखील राणेंनी भाष्य केले. मला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण ते नेमके मुख्यमंत्री कसे झाले ते आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घेऊन पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा इतर कोणी शिवसैनिक नव्हता. ‘साहेब आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. त्यामुळे आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे’ , असे या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितले असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय?

'मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय?' 'मागच्या दोन वर्षात त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रुपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवलं? असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला.

शिवसेना पुळचट, घाबरट लोकांमुळे वाढली नाही

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार.., असा उल्लेख सामनामध्ये आला आहे. त्यांचे कुणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसुड ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे का? डरकाळी कुणी द्यावी? कुणाच्या जीवावर? भाषण करताना हात वर करून आव आणणं वेगळं आणि अंगावर आलेल्यांना समोरून जबाब देणं वेगळं. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही. कुणाच्या गालाला पाच बोटं सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता?', असा टोला देखील राणेंनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

Kolhapur Gokul Politics: सतेज पाटलांसोबतच्या छुप्या मैत्रीचा आरोप करत महायुतीत मुश्रीफांना एकटं पाडण्याचा डाव?

Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शन

SCROLL FOR NEXT