BJP narayan rane on ncp sharad pawar over rebel mla maharashtra political crisis  Narayan Rane
महाराष्ट्र बातम्या

त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास...; राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

रोहित कणसे

एकनाथ शिंदे यांच्या बडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना बहुमत सिध्द करण्यासाठी इकडे यावेच लागेल असे शरद पवारांनी म्हटले, यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट शरद पवारांना इशारा दिलाय. राणे म्हणालेत की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असे नारायण राणे म्हणाले आहेत. (BJP narayan rane on ncp sharad pawar over rebel mla maharashtra political crisis)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल, तसेच आमदारांना बंडोखोरीचे परिणाम भोगावे लागतील असेही शरद पवार म्हणाले. या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट इशारा दिलाय.

नारायण राणे म्हणाले आहेत की, आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. तसेच त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला, संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, अशी खोचक टीका केली आहे.

नारायण राणे यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT