नारायण राणे, उद्धव ठाकरे google
महाराष्ट्र बातम्या

टप्प्याटप्प्याने सगळे बाहेर काढणार - राणेंचा शिवसेनाला इशारा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाचा दुसरा अंक आज कोकणात पाहायला मिळाला. पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर ठप्प झालेली राणे यांची जनसंघर्ष यात्रा आज पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. तिचा समारोप सिंधुदुर्गमध्ये झाला. या दोन्ही ठिकाणांवर राणेंनी नेहमीच्या आक्रमक शैलीत शिवसेनेवर निशाणा साधला तर त्याला शिवसेना नेत्यांनीही त्याच भाषेत उत्तर दिल्याने आरोप-प्रत्यारोपांचे वार पाहायला मिळाले. ‘‘ आम्हाला घरात बसून कारभार करायचा नाही. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. रमेश मोरेची हत्या का झाली? त्याचे कारण काय? वहिनींवर अॅसिड फेकायला कोणी सांगितले, अशा अनेक गोष्टी माहिती आहेत. टप्प्याटप्प्याने मी प्रकरणे बाहेर काढणार आहे.

सुशांत, दिशा सॅलियनची केस संपलेली नाही. कायदा आम्हालाही माहिती आहे. दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड नाही. शिवसेनेत ३९ वर्षे होतो मी. तुम्ही अनुभवले आहे आम्हाला, जवळून पाहिले आहे. नको त्या वाटेत जाऊ नये, पुन्हा एकदा मी खणखणीत वाजवणार आहे.’’ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. भाजप कार्यालयात आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. ‘‘ शिवसेना औषधालाही सापडणार नाही’’ या विधानावरसुद्धा ते खटले दाखल करतील, अशी खिल्ली त्यांनी उडवली. शिवसेनेचे नाव एक-दोनदाच घेत, आमच्या घरावर हल्ला करणाऱ्या वरुण सरदेसाईला अजून अटक झालेली नाही. त्याला पोलिस बंदोबस्त असूनही तिथल्या मुलांनी चोपला. तो पुन्हा आला तर परत जाणार नाही. आम्ही सोडणार नाही. तो जमा करून आणतो. त्याची वट आहे म्हणून अटक झाली नसेल, असेही राणे यांनी सांगितले.

रत्नागिरीत बोलताना काय म्हणाले राणे?

युतीबाबतच्या विषयावर बोलणार नाही

पिंजऱ्यातून कोणी सत्ता चालवत नसते

दोन राऊतच शिवसेनेला बुडवतील

भविष्यात आम्ही देखील सत्तेत येऊ

कोरोना निर्बंधांचा बाऊ केवळ माझ्यापुरता

गुन्हेगार होतो तर मुख्यमंत्री कसे केले?

वरुण सरदेसाईला पुन्हा सोडणार नाही

सुशांतसिंह, दिशा सॅलियनची हत्याच झाली

जनआशीर्वाद यात्रेस लोकांचा प्रचंड प्रतिसाद

राज्याकडून केंद्रीयमंत्र्यास दरोडेखोरासारखी वागणूक

संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागले पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे जशी ॲक्शन तशी रिॲक्शन असते. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना संयम पाळायला हवा. ते आमचे नेते आहेत.

- उदय सामंत, नेते शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT