BJP Nilesh Rane convoy vehicles attacked in guhagar chiplun Bhaskar jadhav BJP Uddhav Thackrey Faction  clashed
BJP Nilesh Rane convoy vehicles attacked in guhagar chiplun Bhaskar jadhav BJP Uddhav Thackrey Faction clashed  
महाराष्ट्र

Nilesh Rane Attack News : राणे अन् ठाकरे समर्थक भिडले! चिपळूण येथे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

रोहित कणसे

BJP Vs Thackeray Group Clash : गुहागर येथील सभेच्या पूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चिपळूण येथे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या देखील फोडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. गुहागरला जाण्यापूर्वी निलेश राणे यांचा चिपळून येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राणेंचा ताफा पुढे निघूव गेल्यानंतर ताफ्यातील गाड्यांवर मागून दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर पोलीसांनी कारवाई करत दोन्ही गटांना दूर करण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेमकं काय झालं?

या दगडफेकीच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपचे नेते निलेश राणे हे गुहागर येथे माझ्या मतदारसंघात सभा घेण्याकरिता येणार अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती. टीझर व्हायरल करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या कार्यलयाबाहेर गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार अशाप्रकारचे बॅनर झेंडे लावण्यात आले होते.

चिपळूनची संस्कृती आहे कोणाची सभा असल्यावर कोणच्या झेंड्याला हात लावला जात नाही. आम्ही त्यांच्या झेंड्याला हातही लावला नव्हता. पण सभा गुहागरला होती, निलेश राणे मुंबईहून आले. वास्तविक त्यांनी दापोलीमार्गे फेरी बोटीने गुहागरला जाणे अपेक्षित होते. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणहून आले. त्यांनी माझं ऑफिस आणि घरासमोर स्वतःचा सत्कार करुन घेण्याची योजना आखली .

आधी ते रेस्ट हाऊसला गेले. त्यानंतर दुपारी माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी स्वागत आणि सत्कार ठेवला. साडेतीन पर्यंत ते रस्त्यावर आले नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी क्रेन लावण्यात आली होती ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला गेला.

खूप उशीर झाल्यानंतर मी लोकांना शांततेने घरी जाण्याचं जाहीर आवाहन केलं. आम्ही विषय संपवला होता. त्यानंतर त्यांनी निलेश राणे यांचा सत्कार केला, फटाक्यांची आतिशबाजी केली. हातवारे करत, नाचगाणी करत आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला, त्याचाही त्रास झाला नाही. पण मी परत गेल्यावर तिकडून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर इकडून दगडफेक सुरू झाली असे भास्कर जाधव म्हणाले.

त्यांनी जाणीवपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेक केल्यानंतर आमच्याकडून दगडफेक झाली. पण पोलिसांनी लाठीचार्ज आमच्यावर केला. अश्रुधूराच्या नळकांड्या आमच्या बाजूने फोडल्या असेही भास्कर जाधव म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT