Nilesh Rane and sharad Pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

"ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम", जूना दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लेखनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या लेखनात महाराजांवर जेवढा अन्याय केला आहे, तेवढा अन्याय अन्य कोणत्याही लेखकाने केला नसल्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा राजकरारण तापताना दिसत आहे. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण महासंघाकडून पवारांवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी शरद पवार यांच्यावर "पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा" असे म्हणत एक अभिप्रायाचा फोटो शेअर केला आहे. राणे यांनी पुढे म्हटले आहे की, "१६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत."

तसेच निलेश राणेंनी पोस्ट केलेल्या कथित अभिप्रायच्या फोटोमध्ये, "बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगिरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली, महारांजाच्याबद्दल अपूर्व आत्मियता, अभिमान ही शिवशाहिरांची पेरणा असल्याने शिवसृष्टी जीवंत वाटते. राज्याभिषेकाचे दृष्य अतिशय प्रेरणादायक व उत्कृष्ट आहे. या निमित्ताने प्रखर, राष्ट्रभक्ती अपार मातृप्रेम, स्वच्छ चरित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा या निमित्ताने करूया. शिवशाहिरांच्या प्रयत्नास संपुर्ण सदिच्छा" असा मजकूर लिहिलेला असून खाली शरद पवार यांची सही दिसत असून या सहीच्या खाली १६-५-१९७४ ही तारीख देखील दिसत आहे.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल बोलताना, दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास लिहिला नाही. त्यांनी त्यांच्या लेखनात शिवाजी महाराजांवर कायम अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी नवीन पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे म्हटले होते.

पुढे बोलताना त्यांनी, राज्य सरकारने मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या नात्याने दादोजी कोंडदेव यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला होता. पण त्यावेळी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का, याचा शोध घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच. त्यांचे खरे गुरु हे राजमाता जिजाऊ याच आहेत. तसेच शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचाही दुरान्वये संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT