BJP Nitesh rane alleges sanjay raut for Aditya Thackeray and Tejas Thackeray fight over Yuva Sena chief post
BJP Nitesh rane alleges sanjay raut for Aditya Thackeray and Tejas Thackeray fight over Yuva Sena chief post  
महाराष्ट्र

Shiv Sena News : युवासेना प्रमुख पदावरून आदित्य-तेजस यांच्यात वाद; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

रोहित कणसे

आदित्य ठाकरे यांचं वाढतं प्रस्थ कमी करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडणं लावण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचा दावा देखील राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात वाद लावण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू होतं आरोप भाजप नेते नितेश राणे यांने केला आहे. शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून संजय राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.

युवासेना प्रमुख म्हणून वरूण सरदेसाईंच नाव पुढे येत होतं, ते अचानक गायब झालं. यामागचं कारण म्हणजे, युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई झाल्यास आदित्य ठाकरेंची ताकद वाढणार मग आमचं काय होणार म्हणून लगेच तेजस ठाकरेंच्या नावाने सामनामध्ये जाहिरात झापून आणली जायची. तेजस ठाकरेंचे बॅनर लावायला महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सांगितलं जायचं असा दावा राणेंनी केला.

तेजस ठाकरे मातोश्री सोडून निघून गेले..

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या काळात या दोन्ही भावात मातोश्रीमध्ये भांडणं सुरू झाली. काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतच्या फार्महाऊसवर राहायला गेले होते, असा दावा देखील नितेश राणे यांनी यावेळी केला आहे. संजय राऊतांना ज्या घरात मीठ खाल्लं तेथेही भांडणं लावण्याचं काम केलं असा आरोपही राणेनी यावेळी संजय राऊत यांच्यावर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT