Kirit-Somaiya  sakal
महाराष्ट्र बातम्या

"किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने देशातली जनता नाराज"; राष्ट्रवादीचा टोला

भाजपाने धनंजय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडेंना उमेदवारी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यासह देशभरात आता राज्यसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. उमेदवारीच्या वाटपानंतर काही जण नाराज तर काही जण आनंदी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांचा एक हसऱ्या चेहऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी दिलेलं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे. (Amol Mitkari on Kirit Somaiya)

अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ट्वीट करत किरीट सोमय्यांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मिटकरी म्हणतात, "तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडून ओरडून रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे".

भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार कोण?

राज्यसभेची (Rajyasabha Election) निवडणूक १० जून रोजी होणार आहे. यासाठी भाजपाकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकीवरून कुठे नाराजी तर कुठे आनंदाचा सूर पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT