विजय वडेट्टीवार e sakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप उघडे पडले - विजय वडेट्टीवार

भाजपने केवळ ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठी समाजाची दिशाभूल केली आहे.

सुनील इंगळे

औरंगाबाद : केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आडमुठे धोरण स्वीकारले आहे. भाजपने केवळ ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठी समाजाची दिशाभूल केली आहे. मात्र, आता ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप उघडे पडले आहे. आता त्यांची बनवाबनवी फार काळ चालणार नाही. आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाची वज्रमूठ आवळली जाईल. यासाठी लवकरच मराठवाड्यातील पाच लाख ओबीसींचा मेळावा घेण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. औरंगाबाद (Aurangabad) येथे रविवारी (ता.२७) गांधी भवनात जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) यांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. (BJP Not Support OBC Reservation, Said Vijay Wadettiwar)

या मेळाव्यास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, कॉंग्रेस हा पक्ष नसून विचार आहे. मात्र कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करणारे संपले. पण कॉंग्रेसचे विचार कायम आहे. सत्तेत असो अथवा नसो कॉंग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविण्याचे काम करावे लागेल. दरम्यान जातीचे राजकारण करून भाजपने ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. मात्र आता ओबीसी समाज जागृत झाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या विरोधात १४ मार्चला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काढला जाणारा मोर्चा हा भाजपला धडकी भरवणारा ठरणार आहे, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, ओबीसीचे जिल्हाप्रभारी राजेंद्र राख, आमदार अभिजित वंजारी, माजी शहराध्यक्ष नामदेव पवार, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अतिष पितळे, अनिल मालोदे, गौरव जैस्वाल, सत्संग मुंढे, माजी महापौर अशोक सायन्ना, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, प्रभाकर मुठ्ठे, डॉ. पवन डोंगरे, महिला अध्यक्षा हेमा पाटील उपस्थित होते.

कॉंग्रेस नेत्यांना न्याय मिळत नाही

गेल्या महिन्यात औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरकारमध्ये असून देखील आपली कामे होत नाहीत. न्याय मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. आता राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील कॉंग्रेसला न्याय मिळत नसल्याची, खंत व्यक्त केली. पण भाजपला रोखायचे असल्यामुळे समजून घ्यावे लागते, असेही ते म्हणाले. सत्तेतील इतर पक्षांचे पालकमंत्री कॉंग्रेसच्या नेत्यांना न्याय देत नसल्याचे सांगत या विषयावर आपण मंत्रिमंडळ बैठकीत बोलणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Turbulence Incident : एअर इंडिया फुकेत-दिल्ली फ्लाईटच्या 'त्या' घटनेबाबत धकक्कादायक माहिती समोर; मुख्य पायलटने ओढला होता गांजा

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान T20I मालिका सप्टेंबरमध्ये होणार! ACB कडून तारखांबाबत मोठी अपडेट

Manoj Jarange Patil यांच्या डिफेंडर गाडीवरून नेमकी चर्चा काय?

धक्कादायक! सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत आढळला केस, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; FDAकडे कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

SCROLL FOR NEXT