Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey : कौतुक करत भाजपची राज ठाकरेंना खुली ऑफर

राज ठाकरे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. पक्षांमध्ये फुट पडली. नवीन सरकार स्थापन झालं, इतर पक्षांनी युती केली. अशातच सर्व घडामोडीमध्ये जास्त हस्तक्षेप नसलेला आणि सर्व घडामोडी जवळून पाहणाऱ्या मनसेच्या अध्यक्षांना म्हणजेच राज ठाकरे यांना भाजपने ऑफर दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अधयक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचं कौतुकही केलं आहे. राज ठाकरे यांच्या प्रगल्भतेमुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याशिवाय राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करु शकतात, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. तर राज ठाकरे यांचं कौतुक करताना बावणकुळे म्हणाले की, वैचारिक मनोमिलनासाठी आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. राज ठाकरे आमचे एक चांगले आणि दिलदार मित्र आहेत. ते खुल्या मनाने आणि खुल्या विचाराने बोलणारे व्यक्तीमत्व आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना बावणकुळे म्हणाले की, मनात एक ठेवायचं आणि तोंडावर वेगळं बोलायचं असं राज ठाकरे करत नाहीत. कपट कारस्थान करणारे राज ठाकरे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळेच आमचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले आहेत, असं बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT