pankaja munde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde BJP Update : मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक... राजकीय भूकंपानंतर मोठा गौप्यस्फोट

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील होण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याच्या, तसेच त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर आल्या. यानंतर आता आज (७ जुलै) पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

माझी भूमिका थेट असणार आहे. स्पष्टपणे सांगते अनेक पक्षांनी माझ्याबद्दल विधान केलं. माझ्या पक्षाला सन्मान वाटत असेल माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून-छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे असे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सध्या राज्यात कोणची सत्ता, कोणाला मंत्रिपद, हे आमला हवंय ते आम्हाला हवंय असं सुरू आहे. यात लोकांचं काय? तरुणांचं, महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचं काय? सुपरस्टारचा मुलगा असल्याने त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याची चर्चा होते. पण एवढ्या सोप्या पद्धतीने देशात ड्रग्ज मिळतं यावर का चर्चा होत नाही? असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला.

दोन-तीन महिने राजकारणातून सुट्टी

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एखाद्या पदावर विराजमान माणसाकडे जर काही माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेऊन त्याचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केली नाही पाहीजे. त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहीजे.

माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कंफ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुडे म्हणाल्या आहेत.

तर राजकारणातून एक्झीट घेईल

मला एक-दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर सांगितलं होतं, ज्या विचारधारेला समोर ठेवून मी राजकारणात आले त्यांच्याशी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातील एक्झीट घ्यायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

नाराज नाही, पण दुःखी आहे

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मी कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशाबद्दल भेटले नाही. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्रत्यक्ष कधी पाहिले ही नाही. मी नाराज नाही, पण दुःखी आहे असेही जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT