Pankaja Munde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde News : विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात! देवदर्शनासाठी राज्यभरात करणार ५ हजार किमीचा 'शिवशक्ती' दौरा

रोहित कणसे

मागील तब्बल दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पंकजा मुंडे या ११ दिवसांत राज्यातील १० पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा सुरू करणार आहेत. या दौऱ्याला 'शिवशक्ती' असं नाव देण्यात आलं असून हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादीत असेल असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या दौऱ्यात पंकजा मुंडे राज्यातील १० पेक्षा अधिक जिल्ह्यातून ५ हजार किलोमिटरचा प्रवास करणार आहेत. तसेच त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात ही छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन होणार आहे. यानंतर त्या नाशिक, नगर , पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील मंदिरांत देवदर्शन करणार आहेत.

राज्यातील ११ जिल्ह्यातून होणाऱ्या या देवदर्शन दौऱ्यात फक्त मंदिरात देवदर्शन करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र असे असले तरी या दौऱ्याला राजकीय महत्व देखील असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार हा दौरा फक्त देव दर्शनापुरता राहाणार नाही, त्या या दौऱ्यात राजकीय कार्यकर्त्यांशी भेठी घेतील आणि या दौऱ्याची व्याप्ती वाढत जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT