chandrkant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

'त्या' चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची घेतलीय सुपारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलले जाते. केवळ चौघेच पक्ष चालवतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सामान्य कार्यकर्ता भेटू शकत नाही. असे आरोप करणारी एक पोस्ट भाजप कार्यकर्त्यांने सोशल मीडियावरून व्हायरल केली. त्यामुळे पक्षात चांगलीच खबळबळ झाली. दरम्यान एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने त्याला प्रत्युत्तर देणारी पोस्ट व्हायरल केली. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सर्वच राजकीय पक्षात कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात; पण भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यां विरोधातील नाराज थेट सोशल मीडियावरच व्यक्त केली आहे. पोस्टमधील माहितीनुसार, भाजपच्या शहर कार्यकारिणीत समन्वय नाही. सर्व सूत्रे चौघांकडे आहेत. हे चौघे केवळ आपला स्वार्थ साधत आहेत. ते कोणालाही विश्वासात घेत नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चांगले आहेत; मात्र हे चौघे त्यांच्यापर्यंत पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांना पोहचूच देत नाहीत. हे चौघे त्यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालवतात. त्यामुळे राज्यात सत्ता होती तेव्हाही पक्षाचा विस्तार झाला नाही. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे तिकिट देतो असे सांगून हे चौघे कामे करून घेत आहेत. त्यांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारीच घेतली आहे. असे आरोप पोस्टमधून केले आहेत. दोन दिवसांपासून या पोस्टबद्दलची चर्चा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत रंगली आहे.

ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे उत्तर

या पोस्टवर पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. त्यांच्या पोस्टमधील माहितीनुसार, मी गेली ४० वर्षे पक्षाचे काम करत आहे. पक्षात कोणी नाराज नाही. ज्यांना काही प्रश्न असतील ते पदाधिकाऱ्यांबरोबर थेट बोलू शकतात. पक्षाचा विस्तार नेहमीच होत राहिला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नसणाऱ्या काही जणांनी पक्षाची बदनामी करण्याचे षङ्यंत्र केले असून पक्षाच्या विरोधातील पोस्ट हा त्याचाच एक भाग आहे. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे.

दादा आमच्याकडे का नाही?

गणेशोत्सवामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनी कोणाच्या घरी जायचे याची यादी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निश्चित केली. या यादीमध्येही काटछाट झाल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला असून आमच्या घरी दादा का आले नाहीत? या वरूनही पक्षात नाराजी नाट्य सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT