महाराष्ट्र बातम्या

मुंबईमध्ये दाखल होताचं 'राहुल गांधी वापस जाओ'च्या घोषणा, भाजपचे कार्यकर्ते 'या' कारणामुळे आक्रमक

राहुल गांधी यांनी काही वर्षांपुर्वी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

Manoj Bhalerao

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या 'इंडिया'युतीची बैठक पार पडली. जेव्हा राहुल गांधी आणि सोनिया गांधी मुंबईच्या हॉटेलमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांचे ठिकाणी ढोल-ताशांचा गजरात स्वागत करण्यात आले. मात्र, ग्रँड हयात हॉटेलच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी राहुल गांधींविरोधात पोस्टरबाजीही करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधीं विरोधात भाजप युवा मोर्चातर्फे गुरुवारी आंदोलन पुकारले. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले. त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप युवा मोर्चाने मुंबई विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाची हाक दिली.

मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन करताना भाजपच्या कार्याकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी 'राहुल गांधी वापस जाओ'च्या घोषणा दिल्या गेल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात त्यांनी वक्तव्य केले, असा या आंदोलकांनी आरोप केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केली आणि त्यांना ताब्यात घेतलं.

मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या या बैठकीत समन्वय समिती आणि इंडिया आघाडीच्या लोगोविषयी चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT