bjp political leader Mohit Kamboj controversy history  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mohit Kamboj इतिहास सांगतो ते जिथे असतात तिथे मोठा घोळ सुरू असतो

राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेल मध्ये जाईल, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

धनश्री ओतारी

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेल मध्ये जाईल, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात कंबोज यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मोहित कंबोज हे नेहमी जिथे घोळ सुरू असतो तिथे हजर असतातच. याचा प्रत्यय अनेकवेळी आला आहे.(bjp political leader Mohit Kamboj controversy history)

मोहित कंबोज हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंटमॅन आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

आर्यन खान प्रकरणातही मोहित कंबोज यांचे नाव गाजलं

आर्यन खान हे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणाचा सूत्रधार मोहित कंबोज आहे असा आरोपही त्यांनी केला होता. मोहित कंबोज यांनी हे आरोप फेटाळले.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर 2 ऑक्टोबरला NCB ने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) धाड टाकली. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

यात भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालाही ताब्यात घेतलं होतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. तसेच, मोहित कंबोज याच्या मेहुण्याच्या माध्यमातून आर्यन खानला क्रूझवर नेलं असंही नवाब मलिक यांनी म्हटले होतं.

कंबोज यांच्या गाडीवर 'मातोश्री'जवळ शिवसैनिकांचा हल्ला

राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा दरम्यान, शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला होता. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.

मोहित कंबोज शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, त्यावेळी हा हल्ला झाल्याचं शिवसैनिकांनी म्हटले होते.

सुरतच्या हॉटेलमध्येही दिसले होते..

मोहित कंबोज यांनी ठाकरे सरकार पाडण्यामागे महत्वाची भूमिका बजावली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडादरम्यानही भाजप नेते मोहित कंबोज चर्चेत आले होते. त्यावेळी समर्थक आमदार सुरतमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथे भाजप नेते मोहित कंबोज यांनीही हजेरी लावल्याचं स्पष्ट झालं होतं.

सोशल मीडियावर एकनाथ शिंदे समर्थक आमदारांमागे मोहित कंबोज बसल्याचं दिसून आलं होतं. त्यावेळी याबाबत उलटसुलट चर्चा झाली होती.

सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा- कंबोज

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याला एक्सपोझ करणार आहोत, असं ट्विट मोहित कंबोज यांनी मंगळवारी (16 ऑगस्ट) रात्री 10 वाजता केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT