aurangabad jp nadda public meeting esakal
महाराष्ट्र बातम्या

J.P. Nadda Video : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या; पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका?

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबादः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेला अजिबात गर्दी नसल्याचं दिसून आलं. खुर्च्या रिकाम्याच असल्याने विरोधक खिल्ली उडवत आहेत.

मागील दोन दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर आलेलं होतं. त्याचं कारण पंकजा मुंडे यांचं नाव पत्रिमध्ये नव्हतं. त्यामुळे पंकजा मुंडेसुद्धा नाराज असल्याचं सांगितलं जात होते. आज मात्र कार्यक्रमाच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो घेण्यात आला.

औरंगाबादच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे काही क्षणच बोलल्या. त्यामुळे त्यांच्या मनात खदखद आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. महत्त्वाचं म्हणजे जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये निम्म्यांपेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांचं मराठवाड्यात प्रस्थ आहे. त्यांना डावलण्याच्या पक्षाच्या धोरणामुळेच सभेला अल्पप्रतिसाद मिळाल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत.

दरम्यान, विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नड्डांच्या सभेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ''अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.'' असं ट्विट दानवेंनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

Sangli Crime: प्रियकराच्या मदतीने २२ वर्षीय पत्नीने झोपेतच पतीला संपवलं; आधी प्रेमविवाह, नंतर दुसऱ्यावर जडला जीव, आता बाळासोबत कोठडीत

'वर्षभरापासून वेगळे राहतोय...' गौरव खन्नाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'आम्ही घटस्फोट घेतोय'

SCROLL FOR NEXT