Arjun Khotkar - Raosaheb Danve Sakal
महाराष्ट्र बातम्या

जालन्याचं वैर दिल्लीत संपणार? दानवे-खोतकरांची दीड तास खलबतं

काही दिवसांपूर्वी ईडीची धाड पडलेले सेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी दिल्लीत आज भाजपच्या रावसाहेब दानवेंशी दीड तास चर्चा केली.

दत्ता लवांडे

दिल्ली : शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर हे मागच्या आठवड्यापासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती पण आज त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्यामुळे जालन्यातील दानवे आणि खोतकर यांचे वैर संपणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Arjun Khotkar And Raosaheb Danve Meeting)

रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांशी जवळपास दीड तास दिल्लीत चर्चा केली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात एकमेकांचे विरोधक असलेले दोन नेत्यांमधील वैर संपले का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान काल खोतकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मी अजून शिवसनेतच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांच्या मालमत्तेवर काही दिवसांपूर्वी ईडीची धाड पडली होती त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांवर ईडीची धाड पडली होती. साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची ईडीकडून सध्या चौकशी चालू आहे. तर दोन दिवसांपासून ते दिल्लीत भाजप नेते रावसाहेब दानवे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत असून त्यांनी आजच्या दानवे भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

"काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान दानवेंनी आज मला चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो पण आमच्या भेटीचा कोणीही गैरअर्थ घेऊ नये. मी दिल्लीत का आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, माणसांच्या काही अडचणी असतात, कौटुंबिक असो किंवा कोणतीही असो. तोच ताण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. नाही त्या गोष्टीमध्ये माणसांना अडचणी निर्माण केल्या जातात. माणूस अडचणीत असलं तर तो सेफ व्हायचा प्रयत्न करत असतो." असं मत अर्जुन खोतकरांनी दिल्लीत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT