Eknath Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : भाजप CM शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. अनुराग ठाकूर यांचा हा एकदिवसीय दौरा असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून भाजपने महाराष्ट्रातील एकूण 16 लोकसभा मतदर संघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. या लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे.

तर कल्याण हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा या मतदार संघात येत असल्यामुळे भाजप या मंतदार संघावर दावा करणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

१४ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या अनुराग ठाकूर पुन्हा एकदा कल्याण मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे का? शिवाय कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं काय होणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

अनुराग ठाकूर यांच्या या दौऱ्याची माहिती भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभेचा दुसऱ्यांदा दौरा होत आहे. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांचा एकदिवसीय दौरा आहे. मागील वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता.”

उद्या (१४ फेब्रुवारी रोजी) अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत,” अशी माहिती संजय केळकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा, निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेची तारीख बदलल्यानंतरही गोंधळ

Labourer wins lottery : मजुराने जिंकली १.५ कोटींची लॉटरी पण उभ राहिलं नवं संकट, घर सोडून अख्खं कुटुंबच गायब, नेमकं काय घडलं?

बळीराजासाठी जगण्यापेक्षा मरण बरं! विदर्भात ४ हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर, सरकार कधी गंभीर होणार?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

Tiger Relocation Chandoli : चांदोली जंगलात आणखी एका वाघीणीची एन्ट्री; ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबाची दुसरी मादी दाखल, Video

SCROLL FOR NEXT