breaking news
breaking news 
महाराष्ट्र

Election Results : 'महाराष्ट्र का हाथ, युती के साथ'; आघाडीची वाट

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे. 

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तविला होता. अखेर 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांनी तेवढ्याच 42 जागा राखण्यात यश मिळविले. भारतीय जनता पक्षाला 23 व शिवसेनेला 23 जागा मिळविण्यात यश आले आहे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या वेळी युतीमध्ये होती. पण, त्यांनाही कोणतेही यश मिळालेले नाही.

स्थापनेपासून वीस वर्षांनंतर यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस खासदारांचा दुहेरी आकडा गाठेल, असे वातावरण तयार झाले असले; तरी तशी शक्‍यता अजिबात नाही. पण, राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा अधिक जागा म्हणजे किमान चार जागा राखण्यात तरी यश मिळविल्याचे दिसत आहे.  

काँग्रेस नेतृत्वातील आघाडीत सहभागी होण्याबाबत खूप चर्वितचर्वण झाल्यानंतरही ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडेल व त्या फाटाफुटीचा लाभ भाजप-शिवसेना युतीला होईल, असा अंदाज होता. झाले नेमके तसेच, कारण काँग्रेस ज्या जागांवर मागे गेले तेथे थेट मते वंचित बहुजन आघाडीला मिळाल्याने स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा थेट फायदा युतीला झाल्याचे स्पष्ट आहे. 

महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिलदरम्यान चार टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातील दहा; तिसऱ्या टप्प्यात खानदेश, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मिळून चौदा आणि चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे मिळून सतरा जागांसाठी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात केवळ नऊ प्रचार सभा घेतल्या. त्यांची गर्दीच्या मुद्द्यावर वर्धा येथील पहिली, तसेच सैन्यदलातील जवानांसाठी मते मागितल्याच्या मुद्द्यावर लातूर आणि मोहिते पाटील व विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर अनुक्रमे माढा व नगर येथील सभाही चर्चेत राहिल्या. मुंबईतल्या त्यांच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. या तुलनेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीचा प्रचार मुख्यत्वे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोडून दिला होता. वर्धा, नांदेड, संगमनेर अशा मोजक्‍या सभांशिवाय त्यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. 

मतमोजणीच्या सुरवातीच्या कलानुसार

युती 
भाजप - 23 
शिवसेना - 20 

आघाडी 
काँग्रेस - 1 
राष्ट्रवादी - 3 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT