esakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही तुमचं पाहा, आम्ही शिंदेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे; बावनकुळेंचा पटोलेंना टोला

बावनकुळेंची पटोलेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या उमेदवारी वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले पटोलेंनी शिंदेची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, कारण भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. नाना पटोले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना भाजपाची तलवार चालविणे हेच शिंदे गटाचे चिन्ह अशी टीका केली होती.

बावनकुळे म्हणाले आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती आहे. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लावू त्यापेक्षा अधिक ताकदीने युतीतील पक्षाच्या उमेदवारासाठी काम करू. मुख्यमंत्री शिंदे आणि आम्ही एक आहोत पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करावी. असं म्हणत बावनकुळेंनी पटोलेंवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाची शक्यता; शाहबाज-झरदारी यांची उडाली झोप, लष्करप्रमुख असीम मुनीर यांची मोठी खेळी

D Y Patil Last Rites Mahadevrao Mahadik : डी. वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी महादेवराव महाडिकांची उपस्थिती; सतेज पाटील-महाडिकांची भेट

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

SCROLL FOR NEXT