BJP started contact with me says Uddhav Thackeray
BJP started contact with me says Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

भाजपकडून माझ्यासोबत संपर्क सुरु- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून माझ्याशी संपर्क सुरु असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे तीनही पक्ष माझ्या संपर्कात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनुरुच्चार ठाकरे यांनी केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना सत्ता स्थापनेबाबत तिढा हा वाढतच चाललेला असताना उद्धव यांनी तिन्ही पक्ष माझ्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने आता नवीन चर्चांना उधाण आले आहे. आघाडीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हावे असे सुचित करताना शिवसेनेला सत्ता स्थापनेबाबत प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावानंतर उद्धव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा आघाडीवराज दबाव आणण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

...तर काँग्रेस होणार सत्तेत सहभागी; पाच वर्षासाठी मिळणार 'हे' पद

मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची बैठक झाली. शिवसेना आमदारांना संबोधित करताना उद्धव यांनी असे म्हटले आहे. बैठकीत उद्धव यांनी शिवसेना आमदारांना काळजी करू नका शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वासही दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हा प्रस्ताव राष्ट्रवादी आणि आघाडीकडूनही दिला असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; असा असेल फॉर्म्युला, काँग्रेसचंही समर्थन ! 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हॉटेल रिट्रीटमध्ये आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली.  अरविंद सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्याचे कौतुकही केलं. तसेच आमदारांना संयम बाळगा, चिंता करण्याची गरज नसल्याचेही सांगितले. पुढच्या 3 ते 4 दिवसांत मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT