अजित पवार, देवेंद्र फडणवीस 
महाराष्ट्र बातम्या

सरकार आणण्यासाठी भाजपकडून काड्या लावायचं काम सुरु - पवार

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात आपलं सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीत काड्या लावायचं काम सध्या भाजपकडून सुरु आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी ही भूमिका मांडली. (BJP starts using match sticks to bring in government says Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, "सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात. परंतू असलं काहीतरी सांगून तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. यासाठी काड्या लावायचंही काम विरोधी पक्षाकडून सुरु आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचे काही सदस्य अर्थसंकल्पाच्या खोलात न जाता नुसता पेपर वाचून अरे हे काय चाललंय? अशी प्रतिक्रिया देतात. म्हणजे शिवसेनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना वाटेल की, अरे उद्धव ठाकरेंना काही कळतं की नाही, दिसंतय की नाही? किंवा काँग्रेसचे नेते काय करतात? असंही त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू शकतं"

तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा आपण अर्थसंकल्प तयार करतो तेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. कुणालाही सरकार चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं तर अशा प्रकारे भेदभाव करुन चालत नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही. त्यामुळं अशा प्रकारचा प्रयत्न सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसही करत नाही. तसेच असा प्रयत्न इतर पक्षांनीही करु नये, अशा शब्दांत पवारांनी भाजपच्या सदस्यांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT