bjp state president chandrakant patil press conference kolhapur 
महाराष्ट्र बातम्या

जे ओबीसींना ते मराठ्यांना द्या म्हणत चंद्रकांत पाटीलांनी सरकारवर टिकेचे उडवले झोड

सुनील पाटील

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे ओबीसींना ते मराठ्यांना असे म्हणून ज्या सुविधा दिल्या होत्या त्या सुविधा सुरु कराव्या लागतील. मराठा आरक्षणाला दिलेली स्थिगिती उठवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्याचा जाहीर निषधे करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज सरकारवर टिकेचे झोड उडवले. कोल्हापूर येथील श्री पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


श्री पाटील म्हणाले, मराठा समाज आरक्षणातून तुर्त बाहेर पडला आहे. तो मागास आहे किंवा नाही असे द्विदा अवस्था सुरु झाली आहे. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस सरकारने 642 अभ्यासक्रमातील विद्यार्थांची पन्नास टक्के शुल्क भरण्यासाठी दोन वर्षासाठी 700-700 कोटी रुपये खर्च केले. मेडिकल व इंजिनिअरिंगचे शुल्कही पन्नास टक्के भरले आहे. शेवटी आरक्षण म्हणजे काय तर राखीव कोट्यातून शैक्षणिक वर्षात ऍडमिशन मिळणे आहे. त्या ऍडमिशनसाठी पन्नास टक्के शुल्क आकारले जाते. हे सर्व फडणवीस सरकारने आरक्षण मिळण्याआधीच केले होते. त्यामुळे या सर्व मराठा विद्यार्थांचे ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे. अशा सर्व विद्यार्थांना ओबीसींना ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती तात्काळ दिल्या पाहिजेत.

तसेच त्या विद्यार्थांची पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क सरकारने भरण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच महाविकास आघाडीला जो लोकप्रतिनिधी किंवा त्यांचा कार्यकर्ता वाटतो त्याला आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळावर नियुक्त करुन सुरु केले पाहिजे. महामंडळ प्रशासनावर सोडून चालणार नाही. प्रशासनामध्ये कोणालाही संवेदना नसते. जे आपली मुले आहेत. त्यांना नियमाच्या बाहेर जावून मदत केली पाहिजे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT