Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : ''मी कधीच भाजपमध्ये येणार नाही'' एवढंच वडेट्टीवारांनी जाहीर करावं; भाजप नेत्याची बोचरी टीका

संतोष कानडे

मुंबईः नव्याने नियुक्त झालेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मागच्या काही दिवसांपासून भाजपवर जोरदार टीकास्र सोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांना उत्तर देताना भाजप नेत्याने बोचरी टीका केली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपमध्ये येणार नाही, एवढं जरी जाहीर केलं, तर ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची, हे लोकांच्या लक्षात येईल. ही त्यांची काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते असे वातावरण आहे. त्यामुळे हास्यस्पद विधानं करण्यात काही अर्थ नाही, असे विधाने करून ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

शरद पवारांच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकांबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सध्याच्या वातावरणात शरद पवार संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे.

इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवतो. त्यामुळे पंडित नेहरूही शिकवले जातील आणि नरेंद्र मोदीही शिकवले जातील. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस समाजवादी आणि भाजप सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल.

विरोधी पक्ष नेत्यांच्या जुन्या भाषणांची क्लिप काढून ऐकवली आणि त्यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातले जुने मत काय? हे सांगितले तर बरं होईल. ते नेहमी भूमिका बदलतात, त्यामुळे भूमिका बदलून ते लोकांना आपल्या बाजूने करू शकत नाहीत, असा घणाघात मुनगंटीवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT