Deepali Sayed vs Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

'दीपाली सय्यदांच्या वक्तव्यामागं दहशतवादी संघटनेचा हात? गुन्हा दाखल करा'

सकाळ डिजिटल टीम

सय्यद यांच्या वक्तव्यामागं कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रू राष्ट्राचा हात आहे का?

सातारा : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कारवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली होती. या घटनेचं समर्थन शिवसेनेच्या पदाधिकारी आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Actress Deepali Sayed) यांनी केलं होतं. समर्थन करताना त्यांनी एक वादग्रस्त विधानही केलं. जर या कारमध्ये सोमय्यांऐवजी पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) जरी असते, तरी ती कार शिवसैनिकांनी (Shiv Sainik) फोडली असती असं त्यांनी म्हटलं होतं. दीपाली सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी (BJP) महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी सातारा शहर पोलीस निरीक्षक (Satara City Police Inspector) यांच्याकडं लेखी निवेदनाद्वारे केलीय.

सुवर्णा पाटील यांनी निवेदनात म्हटलं की, 'दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा, दीपाली सय्यद यांची मुलाखत एका व्हिडिओ क्लिपद्वारे प्रसारित झाली आहे. त्यात त्या म्हणतात की, सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता. यावरून हे लक्षात येते की हा हल्ला पूर्वनियोजित आहे आणि काहीही झालं तरी हल्ला करायचाच, या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता.'

'दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती मिळू शकेल. सय्यद यांच्या वक्तव्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रूराष्ट्राचा हात आहे का? हेसुद्धा तपासणे अत्यंत आवश्यक आहे, असं निवेदनात नमूद केलंय'. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, रिना भणगे, पायल टंकसाळे, अश्विनी हुबळीकर, वनिता पवार, श्वेता पवार व पदाधिकारी उपस्थित होते.

मोदींबद्दल काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

दिपाली सय्यद म्हणाल्या, "त्यावेळची परिस्थितीच तशी होती. हे बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) शिवसैनिक आहेत. जो नडला त्याला फोडला हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. त्या ठिकाणी जर मोदीजींची देखील गाडी असली असती तर तीही फोडली गेली असती" विरोधकांच्या आरोपांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या संकल्प सभा सुरु आहेत, या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांना उत्तर दिली आहेत. हे चुकीचं सुरु असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय. पण आता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महासभा घेत विरोधकांना उत्तर द्यावं, तेव्हाच या सर्व गोष्टी थांबतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT