Shinde Vs Bjp sakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Bjp: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, या मतदार संघावर केला दावा

Latest Maharashtra News : विविध बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली गेली.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात आतापासूनच ओढाताण सुरू झाली आहे. शिंदे गटाचा आमदार असलेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. पक्षाचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांच्याकडून मतदारसंघात थेट कार्यालयाची शोधाशोध सुरू झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशाने ही तयारी सुरू असल्याने महायुतीत ठिणगी पडणार असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष महायुतीत लढला. यात पक्षाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाला गेला. या मतदारसंघासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांपर्यंत भेटून मागणी केली होती. परंतु, शेवटी शिंदे गटाची सरशी झाली होती. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ शिंदे गटाचे काम करायचे का, असा प्रश्न पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर झालेल्या विविध बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली गेली.

महायुतीत ठिणगीची शक्यता

शहरातील मध्य किंवा पश्चिम आणि ग्रामीणमधील कन्नड किंवा वैजापूर मतदारसंघ पक्षासाठी सोडवून घ्यावा, असे यात ठरले. त्यानंतर खासदार डॉ. भागवत कराड यांनीदेखील तसे स्पष्ट केले. आता थेट संघटनमंत्र्यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचना केल्याने या मतदारसंघात विधानसभेचे संपर्क कार्यालय थाटण्यासाठी जागेची शोधाशोधही सुरू झाली आहे. यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आमदार शिरसाट यांच्या कार्यालयाजवळच...

कार्यालयासाठी क्रांती चौक आणि जय टॉवर या दोन ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली. यापैकी एक जागा निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील जय टॉवर हे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयाजवळच आहे.

मतदारसंघात भाजपच्या बूथप्रमुखामुळे खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवाराला मतांची लीड मिळाली. पश्चिम विधानसभा मतदारसंघात पक्षाची मोठ्या प्रमाणात ताकद असल्याने पक्षाने येथून लढण्याचे ठरविले आहे. संघटनमंत्र्यांचे आदेश असल्याने आम्ही कामदेखील सुरू केले. त्यानुसार लवकरच कार्यालयाचा शुभारंभ होईल. पक्षाच्या आदेशानुसार मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे.

- जालिंदर शेंडगे,

शहर जिल्हा सरचिटणीस, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

SCROLL FOR NEXT