Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : आम्हांला अजून 'त्या' मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमच्याकडे अनेक लोक आले पण आम्हांला अजूनही त्या अनेक मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडालेली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय.

एका मुलाखतीमध्ये बोलतांना फडणवीस म्हणाले की, आमच्या आत्मविश्वासामुळे अनेकजण आमच्या संपर्कात असतात. अनेक नेते आमदार संपर्कात असतात. मागच्या पाच वर्षांमध्ये अनेकजण आमच्या संपर्कात आले. संपर्काच्या नात्यातून निवडणुकीमध्ये परिवर्तन घडतं.

ते पुढे म्हणाले की, अजूनही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नसते. राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे आम्ही अद्याप पोहोचलेलो नाही. तिथे पोहोचायला मिळालं तर चांगलंच आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांनी राज्यात चर्चा रंगल्या आहेत. २०१९मध्ये राज्याने पहाटेचा शपथविधी बघितला होता. त्यानंतर अजित पवार सहकाऱ्यांसह पुन्हा राष्ट्रवादीशी एकरुप झाले तर पण त्यावर त्यांनी कधीच स्पष्टपणाने भाष्य केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT