Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंना 'राणे प्रकरण' भोवणार

बाळकृष्ण मधाळे

कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काल (बुधवारी) रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. यामुळे राज्यात काही ठिकाणी भाजप-सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होत एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून मुख्यमंत्री ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य दसरा मेळाव्यात (Dasara Melava) केले होते. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा (BJP District President Nitin Bhutada) हे तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.

कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काल (बुधवारी) रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती.

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राणेंनी, मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना राणेंनी हे विधान केलं होतं. 'त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,' असं राणे म्हणाले होते. या विधानमुळे काल संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ माजला होता. अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून दगडफेक करत निषेध नोंदविण्यात आला, तर दुसरीकडे राणेंच्या जामिनासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात होते.

मात्र, काल (बुधवार) रात्री राणेंना जामीन मंजूर होताच भाजपकडून देखील मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यवतमाळ येथील भाजप जिल्हाध्यक्ष भुतडा हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. मात्र, याबाबत भाजपकडून अद्याप तसा कोणताही दुजारा मिळालेला नाही. त्यामुळे भुतडा कधी तक्रार दाखल करणार हे समजू शकले नाही. आता भाजपने ठाकरेंविरोधात वेगळी खेळी केल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT