Chhagan Bhujbal ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: विधानसभेत भाजपने राष्ट्रवादीला 'इतक्या' जागा देण्याचा शब्द दिलाय; भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal Said In ajit Pawar Meeting: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपने विधानसभेमध्ये ८० ते ९० जागा राष्ट्रवादीला देण्याचा शब्द दिलाय, असा दावा त्यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'योग्य तो वाटा आपल्याला महायुतीमध्ये मिळायला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की ८० ते ९० जागा मिळतील. यावेळी जी खटपट झाली ती खटपट पाहता ही खटपट पुढे होता कामा नये. इतक्या जागा पाहिजेत असं आपल्याला त्यांना सांगावं लागेल.'

भाजपला ८० ते ९० जागा सांगितलं तरच आपल्या ५० ते ६० जागा निवडून येणार. पण, आता तुमच्याकडे ५० आहेत मग ५० घ्या म्हटलं की अजून खाली येण्याचं काम होईल. तसं होताच कामा नये. त्यामुळे त्यांना आताच सांगून टाका. आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

FDA Raid: एफडीएच्या छाप्यात मोठा खुलासा! नागपुरात गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री..

SCROLL FOR NEXT