Lok Sabha Exit Poll 2024  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

निवडणुकीच्या निकालांवरील चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसने अगदी शेवटच्यावेळी आपले प्रवक्ते पाठवले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचे संकेत देत आहे. मात्र, ‘इंडिया’ आघाडी विशेषतः काँग्रेसच्या मनोधैर्यावर याचा फारसा परिणाम पडला नसल्याचे चित्र आहे.

यावेळेचा अंडरकरंट बघता काँग्रेस जागांची शंभरी पार करणार असून ‘इंडिया’ आघाडी सत्तास्थापन करेल, असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. तसेच भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल याबद्दल शंका नाही. मात्र, बहुमताच्या आकड्यापासून भाजप दूर असेल, यावरही काँग्रेसचे नेते ठाम आहेत.

निवडणुकीच्या निकालांवरील चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसने अगदी शेवटच्यावेळी आपले प्रवक्ते पाठवले. एक्झिट पोलमध्ये अशाच आकडेवारीची कल्पना होती, असेही नेत्यांनी सांगितले.

मतदानानंतरचे सर्वेक्षण हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करून तो डेटा मांडला असता तर त्याची विश्वसनीयता अधिक असती. मात्र, या संस्थांनी सॅम्पल किती घेतले, त्यांची सर्वेक्षणाची पद्धत पारदर्शकरित्या प्रेक्षकांपुढे ठेवलेली नाही. त्यामुळे एक्झिट पोल मान्य करणे शक्य नाही.

- सुमीत म्हसकर, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I: भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपली आता सुरू होणार टी२० मालिकेचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

'12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...' सतीश शाह यांचा निधनापूर्वी केलेला सचिन पिळगांवकरांना मॅसेज, म्हणाले...'सतीश आणि मी... '

Latest Marathi News Live Update : 'हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत...'-मनोज तिवारी

Accident News : दुर्दैवी अपघात! गिरनारला देवदर्शनासाठी जात असताना बडोद्यात सांगलीच्या दोघांचा जागीच मृत्यू

पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका

SCROLL FOR NEXT